mr_tw/bible/other/bold.md

3.0 KiB

धीट, धैर्याने, धैर्य (धाडसाने), धैर्य देणे

व्याख्या:

या सर्व शब्दांचा संदर्भ, जेंव्हा कठीण किंवा धोकादायक परिस्थिती असते, तेंव्हा सत्य बोलण्याचा आणि योग्य गोष्टी करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास असण्याशी आहे.

  • एक "धीट" मनुष्य हा जे काही चांगले आणि योग्य आहे ते बोलण्यास घाबरत नाही, ज्यामध्ये ज्या लोकांना चुकीची वागणूक मिळत आहे, त्यांना वाचवण्याचा समावेश होतो. ह्याचे भाषांतर "शूर" आणि निर्भय असे केले जाऊ शकते.
  • नवीन करारामध्ये, शिष्यांनी तुरुंगात जाण्याचा किंवा मारले जाण्याचा धोका असूनसुद्धा येशुबद्दल सार्वजनिक ठिकाणी "धैर्याने" संदेश देण्याचे सुरूच ठेवले. ह्याचे भाषांतर "आत्मविश्वासाने" किंवा "अतिशय धीटपणे" किंवा "धाडसाने" असे केले जाऊ शकते.
  • ख्रिस्ताची वधस्तंभावरील उद्धाराच्या मृत्युचे शुभवर्तमान, शिष्यांनी "धाडसाने" सांगितल्याचा परिणाम म्हणून, हे सुवार्ता संपूर्ण इस्राएल मध्ये आणि जवळच्या देशात आणि शेवटी सर्व जगभरात पसरली. "धाडसाने" ह्याचे भाषांतर "विश्वास धैर्य" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, सुवार्ता, उद्धार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H982, H983, H4834, H5797, G662, G2292, G3618, G3954, G3955, G5111, G5112