mr_tw/bible/other/conceive.md

3.2 KiB

गर्भ धारण करणे, गर्भवत होणे, गरोदर राहीली, गर्भधारणा (धारणा)

व्याख्या:

"गर्भ धारण करणे" किंवा "गर्भधारणा" या शब्दांचा सहसा संदर्भ मुलासह गर्भवती होण्याशी येतो. ह्याचा उपयोग प्राण्यांसाठी केला जातो, जे गर्भ धारण करतात.

  • "लहान मुलाचा गर्भ धारण करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "गर्भवती होणे" किंवा इतर दुसऱ्या शब्दाने ज्याला ह्याच्या संदर्भात ग्रहण केले जाऊ शकते, अशा शब्दाने केले जाऊ शकते.
  • ह्याच्या संबंधित शब्द "गर्भधारणा" ह्याचे भाषांतर "गर्भ धारण करण्याची सुरुवात" किंवा "गर्भ धारण करण्याचा क्षण" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दांचा संदर्भ काहीतरी निर्माण करणे किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करणे, जसे की, एखादी कल्पना, योजना किंवा कार्य ह्याच्या संबंधात सुद्धा येतो. * संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "चा विचार" किंवा "योजना" किंवा "निर्माण करणे" यांचा समावेश होतो.
  • काहीवेळा या शब्दाचा संदर्भ लाक्षणिक अर्थाने केला जातो, जसे की, जेंव्हा पापाचा गर्भ धारण केला जातो" या वाक्यात, ज्याचा अर्थ, "जेंव्हा पापाचा विचार पहिल्यांदा केला जातो" किंवा "पापाच्या अगदी सुरवात" किंवा "जेंव्हा पहिल्यांदा पाप सुरु होते" असा होतो.

(हे सुद्धा पहा: निर्माण करणे, गर्भाशय)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2029, H2030, H2032, H2232, H2254, H2803, H3179, G1080, G1722, G2602, G2845, G4815