mr_tw/bible/other/citizen.md

2.5 KiB

नागरिक (रहिवासी), नागरिकत्व

व्याख्या:

एक नागरिक हा असा कोणीतरी आहे, जो विशिष्ठ शहरात, देशात, किंवा राज्यात राहतो. हे अशा कोणालातरी संदर्भित करते, ज्याला त्या जागेचा औपचारिकरित्या कायदेशीर रहिवासी म्हणून ओळखले जाते.

  • संदर्भावर आधारित, ह्याचे भाषांतर, "रहिवासी" किंवा "कायदेशीर निवासी" असे केले जाऊ शकते.
  • एक नागरिक अशा प्रांतात राहतो, तो एका मोठ्या राज्याचा किंवा साम्राज्याचा भाग असतो, आणि त्याच्यावर राजा, सम्राट, किंवा इतर शासकांच्या द्वारे शासन केले जाते. उदाहरणार्थ, पौल हा रोमी साम्राज्याचा नागरिक होता, ज्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रांत होते; पौल त्यांच्यापैकी एका प्रांतात राहत होता.
  • लाक्षणिक अर्थाने, येशूवर विश्वासणाऱ्यांना स्वर्गाचे "नागरिक" असे, या अर्थाने म्हंटले जाते की, एक दिवस ते तेथे राहतील. जसे एखाद्या देशाचा नागरिक असतो, तसे ख्रिस्ती लोक देवाच्या राज्याचे आहेत.

(पहा: राज्य, पौल, प्रांत, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H6440, G4175, G4177, G4847