mr_tw/bible/other/castout.md

2.8 KiB

बाहेर काढणे, बाहेर काढीत, घालवून देणे, बाहेर फेकणे, बाहेर फेकले

व्याख्या:

एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला "बाहेर काढणे" किंवा "घालवून देणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला किंवा वस्तूला दूर जाण्याची सक्ती करणे असा होतो.

  • "टाकणे" या शब्दाचा अर्थ "फेकणे" असाच होतो. जाळी टाकणे ह्याचा अर्थ जाळीला पाण्यामध्ये फेकणे असा होतो.
  • लाक्षणिक अर्थाने, एखाद्याला, "बाहेर काढणे" किंवा "दूर करणे"ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला नाकारणे आणि त्याला दूर पाठवून देणे असा होतो.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "सक्तीने बाहेर काढणे" किंवा "दूर पाठवणे" किंवा "च्या पासून सुटका मिळवणे" ह्यांचा समावेश होतो.
  • "भूतांना बाहेर काढणे" ह्याचे भाषांतर, "सैतानाला जाण्यास कारणीभूत होणे" किंवा "दुष्ट आत्म्यांना बाहेर काढणे" किंवा "भूतांना घालवून देणे" किंवा "भूतांना बाहेर येण्याची आज्ञा देणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: भुत, भुत-लागलेला, चिठ्ठ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1272, H1644, H1920, H3423, H7971, H7993, G1544