mr_tw/bible/other/biblicaltimewatch.md

2.7 KiB

प्रहर (पवित्रशास्त्राची वेळ), प्रहरी

व्याख्या:

पवित्र शास्त्राच्या काळात, "प्रहर" हा रात्रीच्या वेळेचा कालावधी होता, ज्यामध्ये एखाद्या शहराचा पहारेकरी किंवा रक्षक नोकरी करत असताना, शत्रूकडून काही धोका होऊ शकतो का ह्याकडे लक्ष देत असतो.

  • जुन्या करारात, इस्राएली लोकांचे तीन प्रहर होते, त्यांना "प्रारंभ" (सूर्यास्तापासून रात्री 10 पर्यंत), "मध्यान्ह" (रात्री 10 पासून पाहते 2 पर्यंत), आणि "भल्यापहाटे" (पहाटे 2 पासून सुर्योदयापर्यंत) असे म्हंटले जाते.

नवीन करारात, यहुदी रोमी प्रणालीचे अनुसरण करत होते, आणि त्यांचे चार प्रहर होते, त्यांची नावे "पहिला" (सूर्यास्तापासून रात्री 9 वाजेपर्यंत), "दुसरा" (रात्री 9 पासून मध्यरात्री 12 पर्यंत), "तिसरा" (मध्यरात्री 12 पासून पहाटे 3 पर्यंत), आणि "चौथा" (पहाटे 3 पासून सुर्योदयापर्यंत) प्रहर असे होती.

  • कोणता प्रहार वापरला आहे, त्याच्या आधारावर, ह्याचे भाषांतर अजून सामान्य अभिव्याक्तींनी जसे की, "संध्याकाळी उशिरा" किंवा "मध्यरात्री" किंवा "भल्यापहाटे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: पाहणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H821, G5438