mr_tw/bible/other/watch.md

3.6 KiB

जागरूक असणे, सावध राहा, पहारेकरी, जागे राहणे (सावध राहणे)

व्याख्या:

"जागरूक असणे" या शब्दचा अर्थ एखाद्या गोष्टीकडे अतिशय जवळून आणि बारकाईने बघणे असा होतो. या शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ देखील आहेत. एक "पहारेकरी" हा असा व्यक्ती आहे, ज्याचे काम, शहरातील लोकांना काही धोका किंवा धमकी येतो का हे शहराच्या सभोवताली बघून, शहराचे रक्षण करण्याचे आहे.

  • "तुमचे जीवन आणि शिकवण या विषयी जागरूक असा" या आज्ञेचा अर्थ, सुज्ञतेने जगणे आणि खोट्या शिक्षणावर विश्वास न ठेवण्यासाठी काळजीपुर्वक लक्ष ठेवणे असा होतो.
  • "जागरूक असणे" ही धोक्याचा किंवा हानीकारक प्रभाव टाळण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठीची एक चेतावणी आहे.
  • "जागरूक असणे" किंवा "पहारा ठेवणे" ह्याचा अर्थ पाप आणि दुष्ट ह्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी सदैव सावध असणे असा होतो. ह्याचा अर्थ "तयार असणे" असा देखील होतो.
  • "चा पहारा देणे" किंवा "जवळून पहारा देणे" ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे संरक्षण, रक्षण करणे किंवा काळजी घेणे असा होतो.
  • "जागरूक असणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "बारकाईने लक्ष देणे" किंवा "उद्योगी होणे" किंवा "अतिशय काळजीपुर्वक असणे" किंवा "सावध राहणे" असे केले जाऊ शकते.
  • "पहारेकरी" या शब्दासाठी इतर शब्द "चौकीदार" किंवा "रक्षक" हे आहेत.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H821, H2370, H4929, H4931, H5027, H5341, H5894, H6486, H6822, H6836, H6974, H7462, H7789, H7919, H8104, H8108, H8245, G69, G70, G991, G1127, G1492, G2334, G2892, G3525, G3708, G3906, G4337, G4648, G5083, G5438