mr_tw/bible/other/beg.md

4.6 KiB
Raw Permalink Blame History

विनंती करणे, विनंती केली, विनंती करून म्हणाला, भिकारी

व्याख्या:

"विनंती करणे" या शब्दाचा अर्थ तातडीने कोणालातरी काहीतरी मागणे असा होतो. हे सहसा पैशांची मागणी करण्याशी संबंधित असते, परंतु सामान्यपणे काही गोष्टींसाठी विनंती करणे ह्याच्या संदर्भात देखील वापरले जाते.

  • बऱ्याचदा लोक त्यांना काश्याचीतरी जोरदार गरज असते तेंव्हा विनंती किंवा गयावया करतात, पण त्यांना हे माहित नसते की, समोरचा व्यक्ती जे ते मागत आहेत ते देऊ शकतो की नाही.
  • "भिकारी" हा असा कोणीतरी आहे, जो लोकांना पैसे मागण्यासाठी नियमितपणे सार्वजनिक ठिकाणी बसतो किंवा उभा असतो.
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "गयावया" किंवा "तातडीने मागणे" किंवा "पैश्याची मागणी करणे" किंवा "नियमितपणे पैसे मागणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कळकळीची विनंती करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 10:04 मग देवाने सर्व मिसर देशामध्ये बेडूक पाठविले. फारोने मोशेस बेडूक दूर करण्यास विनंती केली.
  • 29:08 राजाने त्या चाकरास बोलावून घेतले व म्हटले,‘अरे दुष्ट चाकरा! तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व कर्ज तुला सोडिले होते.
  • 32:07 ते दुष्टात्मे येशूला विनवणी करु लागले, ‘‘कृपया आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नका! शेजारच्या टेकडीवर डुकरांचा एक कळप चरत होता. म्हणून, दुष्टात्म्यांनी विनंती केली, “कृपया त्याऐवजी आम्हास डुकरांमध्ये पाठवा!
  • 32:10 पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य येशूच्या बरोबर जाण्यासाठी विनंती करु लागला.
  • 35:11 त्याचा पिता बाहेर येऊन त्यास आत येण्यासाठी व आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करु लागला, परंतू त्याने आत जाण्यास नकार दिला.
  • 44:01 एके दिवशी पेत्र व योहान मंदिरामध्ये जात होते. ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जात असतांना, त्यांनी एक लंगडा भिकारी भीक मागत असतांना पाहिला.

Strong's

  • Strong's: H34, H7592, G154, G1871, G4319, G4434, G6075