mr_tw/bible/other/plead.md

2.6 KiB

विनवणे, याचिका करणे (विनवणे), कैवार घेणे, कैवार घेतो, विनंती केली (कैवर घेतला), फिर्याद (विनवणी)

तथ्य:

"विनवणे" आणि "फिर्याद" या शब्दांचा संदर्भ, एखाद्याला एखादी गोष्ट तातडीने करावयास संगण्याशी येतो. "विनवणे" म्हणजे तातडीची विनंती करणे.

  • बऱ्याचदा विनवणी असे सुचवते की, तो व्यक्ती अतिशय गरजेमध्ये आहे किंवा त्या व्यक्तीला मदतीची अतिशय गरज आहे.
  • लोक देवाला विनवणी करू शकतात, किंवा दयाळूपणाबद्दल आग्रहाची विनंती करू शकतात, किंवा त्याला एकतर स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी काहीतरी देण्याची विचारणा करू शकतात.
  • ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "याचना करणे" किंवा "गयावया करणे" किंवा "आग्रहाची विचारणा करणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
  • "विनवणे" या शब्दाचे भाषांतर, "आग्रहाची विनंती" किंवा "तीव्र आग्रह करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भामध्ये, या संज्ञेच्या भाषांतराचा पैश्यासाठी याचना करणे ह्याच्याशी काहीही संबंध नाही हे सुनिश्चित करा.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1777, H2603, H3198, H4941, H4994, H6279, H6293, H6664, H6419, H7378, H7379, H7775, H8199, H8467, H8469, G1189, G1793, G2065, G3870