mr_tw/bible/other/beast.md

3.8 KiB

प्राणी (वनपशु)

तथ्य:

पवित्र शास्त्रामध्ये, "वनपशु" हा शब्द "प्राणी" म्हणण्याचा सहसा फक्त एक दुसरा मार्ग आहे.

  • एक जंगली प्राणी हा एक प्रकारचा प्राणी आहे, जो जंगलामध्ये किंवा शेतामध्ये मुक्तपणे राहतो आणि त्याला लोकांच्याद्वारे प्रशिक्षण दिलेले नसते.
  • एक पाळीव प्राणी हा असा प्राणी आहे, जो लोकांच्या बरोबर राहतो आणि त्याला त्याला अन्न म्हणून आणि काम करण्यासाठी पाळला जातो, जसे की शेतामध्ये नांगर ओढणे. * बऱ्याचदा "गुरेढोरे" हा शब्द, या प्रकारच्या प्राण्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.
  • जुन्या करारातील पुस्तक दानीएल आणि नवीन करारातील पुस्तक प्रकटीकरण हे दर्शनांचे वर्णन करतात, ज्यामध्ये प्राणी आहेत, जे दुष्ट शक्तींना आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, जे देवाचा विरोध करतात. (पहा: रूपक)
  • ह्यातील काही प्राण्यांचे वर्णन विचित्र वैशिष्ठ्ये असलेली, जसे की अनेक डोकी आणि अनेक शिंगे असणे, असे केले गेले आहे. त्यांच्याकडे बऱ्याचदा सत्ता आणि अधिकार असतो, हे ते कदाचित देश, राष्ट्रे, किंवा इतर राजकीय सत्ता ह्यांचे प्रतिनिधित्व करत असतील, असे दर्शवते.
  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "प्राणी" किंवा "निर्मिलेल्या गोष्टी" किंवा "प्राणी" किंवा "जंगली प्राणी" यांचा समावेश होतो.

((हे सुद्धा पहा: अधिकार, दानीएल, गुरेढोरे, राष्ट्र, सत्ता, प्रकट, बालजबुल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H338, H929, H1165, H2123, H2416, H2423, H2874, H3753, H4806, H7409, G2226, G2341, G2342, G2934, G4968, G5074