2.8 KiB
2.8 KiB
फिलिप्पै, फिलीप्पैकर
तथ्य:
फिलिप्पै हे प्राचीन ग्रीकच्या उत्तरी भागातील मासेदोनियामधील एक मोठे शहर आणि रोमी वसाहत होते.
- पौल आणि सीला ह्यांनी फिलिप्पै येथील लोकांना येशुबद्दलची सुवार्ता सांगण्यासाठी या शहरास प्रवास केला.
- फिलिप्पैमध्ये असताना, पौल आणि सीला ह्यांना अटक झाली, पण देवाने त्यांना अद्भूतरीत्या बाहेर काढले.
- नवीन करारातील पुस्तक फिलिप्पैकरांस हे एक पत्र आहे, जे प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील मंडळीतील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले आहे.
- एक वेगळे शहर कैसरीया फिलिप्पै, जे हेर्मोन पर्वताजवळ, इस्राएलाच्या ईशान्येकडील भागात स्थित होते ह्याची नोंद घ्या.
(हे सुद्धा पहा: कैसरीया, ख्रिस्ती, मंडळी, मासेदोनिया. पौल सीला)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र शिला हे फिलिप्पी नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले.
- दुस-या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सिला यांची सुटका केली व फिलिप्पी शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले.
Strong's
- Strong's: G5374, G5375