4.1 KiB
4.1 KiB
मनश्शे
तथ्य:
जुन्या करारांमध्ये मनश्शे नावाचे पाच वेगवेगळे पुरुष होते:
- मनश्शे हे योसेफाच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव होते.
- मनश्शे आणि त्याचा छोटा भाऊ एफ्राईम या दोघांना योसेफाचा पिता याकोब ह्याने दत्तक घेतले होते, ज्याने त्याच्या वंशजांना इस्राएलाच्या बारा कुळांमध्ये असण्याचा विशेषाधिकार दिला.
- मनश्शेच्या वंशजांनी इस्राएलाच्या कुळांपैकी एक कुळ बनवले.
- मनश्शेच्या कुळाला बऱ्याचदा "मनश्शेचे अर्धे कुळ" असे संबोधले जाते, कारण त्याच्या कुळातील काही भाग हा कनानच्या भूमीत, यार्देन नदीच्या पश्चिमेला स्थायिक झाला. * त्या कुळाचा उर्वरित भाग यार्देन नदीच्या पूर्वेला स्थायिक झाला.
- यहूद्यांच्या राजांपैकी एका राजाचे नाव मनश्शे होते.
- मनश्शे राजा हा दुष्ट राजा होता, ज्याने स्वतःच्या मुलांचे खोट्या देवांसमोर होमार्पण म्हणून बलिदान केले.
- देवाने मनश्शे राजाला शत्रू सैन्याच्या हातामध्ये देऊन त्याला शिक्षा केली. मनश्शे देवाकडे वळला आणि जिथे जिथे मूर्तींची उपासना होत होती त्या सर्व वेद्यांचा त्याने नाश केला.
- मनश्शे नावाचे दोन मनुष्य एज्राच्या काळात राहत होती. त्या मनुष्यांना त्यांच्या मूर्तिपूजक पत्नींना घटस्फोट देणे गरजेचे होते, ज्यांनी त्यांना खोट्या देवांची उपासना करण्यासाठी प्रभावित केले होते.
- अजून एक मनश्शे हा काही दानच्या लोकांचा आजोबा होता, जे खोट्या देवांचे याजक होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: वेदी, दान, एफ्राईम, एज्रा, खोटे देव, याकोब, यहूदा, मूर्तिपूजक, इस्राएलाची बारा कुळे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
Strong's
- Strong's: H4519, H4520, G3128