mr_tw/bible/names/josephot.md

4.1 KiB

योसेफ (जुना करार)

तथ्य:

योसेफ हा याकोबाचा अकरावा आणि त्याची आई राहेल हिचा पहिला मुलगा होता.

  • योसेफ त्याच्या पित्याचा प्रिय पुत्र होता.
  • त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते आणि त्यांनी त्याला गुलामीसाठी विकले.
  • मिसरमध्ये असताना, येसेफावर खोटा दोष लावला आणि त्याला तुरुंगात टाकले.
  • त्याच्या इतक्या अडचणीतूनही, योसेफ देवाशी विश्वासू राहिला.
  • देवाने त्याला मिसरमध्ये दुसऱ्या स्थानाच्या सत्तेच्या जागेवर नेले आणि त्याचा उपयोग जेंव्हा लोकांच्याकडे थोडके अन्न शिल्लक होते, तेंव्हा त्यांना वाचवण्यासाठी केला. मिसरमधील लोकांची, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील लोकांची उपासमार होण्यापासून वाचले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: मिसर, याकोब)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:02 आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले.
  • 08:04 त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले.
  • 08:05 तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला.
  • 08:07 देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले.
  • 08:09 योसेफाने लोकांना सुकाळातील सात वर्षांमध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवण्यास सांगितले.
  • 09:02 योसेफाने केलेल्या कामगिरीचा मिसरी लोकांना विसर पडला.

Strong's

  • Strong's: H3084, H3130, G2500, G2501