mr_tw/bible/names/horeb.md

2.7 KiB

होरेब

व्याख्या:

होरेब पर्वत हे सिनाय पर्वतासाठीचे दुसरे नाव आहे, जिथे देवाने मोशेला दहा आज्ञा लिहिलेल्या दगडी पाट्या दिल्या.

  • हेरोब पर्वताला "देवाचा पर्वत" असेही म्हंटले जाते.
  • होरेब ही जागा होती, जिथे मोशेने मेंढरांना चारताना जाळणारे झुडूप बघितले.
  • होरेब पर्वत ही जागा होती, जिथे देवाने इस्राएली लोकांना त्याच्या आज्ञा लिहिलेल्या दगडी पाट्या देऊन त्यांच्याबरोबरचा स्वतःचा करार प्रकट केला.
  • जेंव्हा इस्राएली लोक वाळवंटामध्ये भटकत होते, तेंव्हा हीच ती जागा होती, ज्यावर पाणी देण्यासाठी, देवाने मोशेला काठी आपटायला सांगितले.
  • या पर्वताचे निश्चित ठिकाण माहित नाही, पण हा कदाचित आताचा सिनाय द्वीपकल्प आहे त्याच्या दक्षिण भागात स्थित असावा.
  • हे शक्य आहे की, "होरेब" हे पर्वताचे प्रत्यक्षात नाव असावे, आणि "सिनाय पर्वत" ह्याचा सरळ अर्थ "सिनायचा पर्वत" आणि त्याचा संदर्भ या तथ्याशी असू शकतो की, होरेब पर्वत हा सिनायच्या वाळवंटात स्थित आहे.

(हे सुद्धा पहा: करार, मोशे, सिनाय, दहा आज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2722