mr_tw/bible/names/gilgal.md

2.8 KiB

गील्गाल

तथ्य:

गील्गाल हे यरीहोच्या उत्तरेस असलेले आणि कनानमध्ये प्रवेश करताना यार्देन नदी पार केल्यानंतर इस्राएली लोकांनी तळ दिलेले पहिले गाव होते.

  • गील्गालमध्ये पोहोचल्यावर यहोशवाने कोरड्या नदीच्या पात्रातून घेतलेल्या बारा दगडांना तिथे स्थापित केले, जे त्याने नदी पार करताना उचलले होते.
  • गील्गाल हे शहर होते, ज्यात एलिया आणि अलीशा हे राहत होते, कारण जेंव्हा एलियाला स्वर्गात उचलण्यात आले, तेंव्हा त्यांनी यार्देन नदी पार केली होती.

जुन्या करारामध्ये, गील्गाल नावाची इतर अनेक ठिकाणे देखील होती.

  • "गील्गाल" या शब्दाचा अर्थ "दगडांचे वर्तुळ" असा होतो, कदाचित त्याचा संदर्भ अशा ठिकाणाशी येतो, जिथे वेद्यांना गोलाकार पद्धतीने बांधण्यात आले होते.
  • जुन्या करारामध्ये, हे नाव नेहमी "गील्गाल" असे आलेले आढळते. हे कदाचित असे सूचित करते की, हे फक्त एका विशिष्ठ ठिकाणाचे नाव नव्हते, तर हे एका विशिष्ठ प्रकारच्या जागेचे वर्णन होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: एलिया, अलीशा, यरीहो, यार्देन नदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1537