mr_tw/bible/names/gath.md

2.6 KiB

गथ, गथच्या, गीत्ती

तथ्य:

गथ हे पलीष्ट्यांच्या पाच मोठ्या शहरांपैकी एक होते. हे एक्रोनच्या उत्तरेस आणि अश्दोद आणि अश्कालोन ह्यांच्या पूर्वेस स्थित होते.

  • पलीष्टी योद्धा गल्याथ, हा गथ या शहराचा रहिवासी होता.
  • शमुवेलाच्या काळात, पलीष्ट्यांनी इस्राएलामधून कराराच्या कोशाची चोरी केली आणि ते त्याला त्यांच्या मूर्तीपूजक मंदिरात अश्दोद येथे घेऊन गेले. नंतर त्याला गथ येथे नेण्यात आले, आणि नंतर एक्रोनाला नेले. परंतु देवाने त्या शहरातील लोकांना रोग पाठवून शिक्षा केली, म्हणून त्यांनी त्याला परत इस्राएलाला पाठवून दिले,
  • जेंव्हा दावीद शौल राजापासून निसटून गेला, तेंव्हा तो गथ येथे पळून गेला आणि तेथे तो त्याच्या दोन बायका आणि सहाशे मनुष्य जे त्याचे निष्ठावान अनुयायक होते, त्यांच्याबरोबर थोडा काळ राहिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अश्दोद, अश्कलोन, एक्रोन, गज्जा, गल्याथ, पलीष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1661, H1663