2.7 KiB
2.7 KiB
गलती, गलतीकरांस
तथ्य:
नवीन करारामध्ये, गलती हा मोठा रोमी प्रांत होता, जो आताचा तुर्की देश आहे त्याच्या मध्य भागात स्थित होते.
- गलती या देशाच्या काही भागाच्या सीमेलगत काळा समुद्र होता, जो त्याच्या उत्तरेस होता. याच्या सीमेलगत आशिया, बिथूनिया, कप्पदुकिया, किलिकिया, आणि पाम्फुलिया हे प्रांत होते.
- प्रेषित पौलाने गलती प्रांतामध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांना पत्र लिहिले. या पत्राला नवीन करारामधील पुस्तक "गलतीकरांस पत्र" असे म्हटले गेले.
- गलतीकरांस पत्र लिहिण्याचे एक कारण म्हणजे तारण हे कृपेद्वारे होते, कृत्यांद्वारे नाही, ह्यावर भर देणे हे आहे.
- तिथे असलेल्या परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांना, यहुदी ख्रिस्ती लोक, काही विशिष्ठ यहुदी नियम पाळणे गरजेचे आहे, असे चुकीचे शिक्षण देत होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: आशिया, विश्वास, किलीकिया, शुभ वार्ता, पौल, काम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 करिंथकरांस पत्र 16:1-2
- 1 पेत्र 01:1-2
- 2 तीमथी 04:9-10
- प्रेषितांची कृत्ये 16:6-8
- गलतीकरांस पत्र 01:1-2
Strong's
- Strong's: G1053, G1054