mr_tw/bible/names/eve.md

3.7 KiB

हव्वा

तथ्य:

हे पहिल्या स्त्रीचे नाव होते. तिच्या नावाचा अर्थ "जीवन" किंवा "जगणे" असा होतो.

  • देवाने अदामाची फासळी काढून त्याच्यापासून हव्वेची निर्मिती केली.
  • अदामाची "मदतनीस" म्हणून हव्वेला निर्माण केले. देवाने दिलेल्या कामात अदामाला मदत करण्यासाठी ती त्याच्या बाजूला आली.
  • हव्वेला शैतानाने भुरळ घातली (सर्पाच्या रुपात) आणि जे फळ देवाने खाऊ नका असे सांगितले होते, ते खाऊन केलेले ते पहिले पाप होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः आदम, जीवन, शैतान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 01:13 मग देवाने आदामाच्या एका फासळीपासून एक स्त्री तयार करुन तिला आदामासमोर आणले.
  • 02:02 परंतु त्या बागेमध्ये एक धूर्त साप होता. तो स्त्रीस म्हणाला, “काय तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय ?
  • 02:11 आदामाने त्याच्या बायकोस हव्वा हे नाव दिले याचा अर्थ “जन्मदात्री कारण तिच्याद्वारेच सर्व माणसे जन्मास आली.
  • 21:01 देवाने वचन दिले की हव्वेला जे संतान होईल ते सापाचे डोके फोडील.
  • 48:02 हव्वेला फसविण्यासाठी सैतानाने सर्पाद्वारे संभाषण केले.
  • 49:08 जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले.
  • 50:16 आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला.

Strong's

  • Strong's: H2332, G2096