mr_tw/bible/names/edom.md

3.3 KiB

अदोम, अदोमी, अदोमांच्या, इदोम

तथ्य:

अदोम हे एसावाचे दुसरे नाव होते. ज्या प्रांतात तो राहिला, ते सुद्धा "अदोम" म्हणून आणि नंतर "इदोम" म्हणून ओळखले गेले. "अदोमी" हे त्याचे वंशज होते.

  • अदोमाच्या प्रदेशाने त्याचे स्थान काळानुसार बदलले. हे मुख्यत्वे इस्रायलच्या दक्षिणेला स्थित होते आणि अखेरीस दक्षिणी यहूदामध्ये विस्तारले.
  • नवीन कराराच्या काळात, अदोमाने दक्षिणी यहूदाच्या अर्ध्या प्रांताला व्यापून टाकले. ग्रीक लोक त्याला "इदोम" असे म्हणत.
  • "इदोम" या शब्दाचा अर्थ "तांबडा" ज्याचा संदर्भ कदाचित, जेंव्हा एसाव जन्मला तेंव्हा त्याच्या शरीरावर तांबड्या रंगाचे केस होते, या तथ्याशी आहे. किंवा त्याचा संदर्भ कदाचित तांबड्या मसूराच्या शिजलेल्या सालीशी आहे, ज्याच्या बदल्यात त्याने आपला जेष्ठपणाचा हक्क विकला.
  • जुन्या करारामध्ये, अदोम देशाचा उल्लेख बऱ्याचदा इस्राएलाचा शत्रू म्हणून केला आहे.
  • ओबद्या नावाचे संपूर्ण पुस्तक अदोमच्या नाशाविषयी सांगते. जुन्या करारातील इतर संदेष्ट्यांनी अदोमाविषयी नकारात्मक भाविष्यवाण्या केल्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शत्रू, जेष्ठत्व, एसाव, ओबद्या, संदेष्ट्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H123, H130, H8165, G2401