mr_tw/bible/names/chaldeans.md

2.4 KiB

खास्दी, खास्द्यांच्या

तथ्य:

खास्दी हे मेसोपटेम्या किंवा बाबेल ह्यांच्या दक्षिणी भागातील एक प्रांत होता. * जे लोक या प्रांतामध्ये राहत होते, त्यांना "खास्दी" असे म्हंटले गेले.

  • ऊर हे शहर, ज्या शहराचा अब्राहाम रहिवासी होता, ते खास्दी या प्रांतात स्थित होते. ह्याला बऱ्याचदा "खास्द्यांचे ऊर" म्हणून संदर्भित केले जाते.
  • राजा नबुखदनेस्सर हा अनेक खास्द्यांपैकी एक होता, जो बाबेलाचा राजा बनला.
  • अनेक वर्षानंतर, सुमारे ई. स. पूर्व 600 मध्ये, "खास्दी" या शब्दाचा अर्थ "बाबेली" असा झाला.
  • दानीएलच्या पुस्तकात, "खास्दी" या शब्दाचा संदर्भ विशिष्ठ प्रकारच्या मनुष्यांच्या वर्गाशी येतो, जे उच्चशिक्षित आणि ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहाम, बाबेल, शीनार, ऊर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H3679, H3778, H3779, G5466