mr_tw/bible/names/abraham.md

5.1 KiB

अब्राहाम, अब्राम

तथ्य:

अब्राम हा ऊर शहरातील एक खास्दी पुरुष होता ज्याला परमेश्वराने इस्राएल राष्ट्राचा पूर्वज म्हणून निवडला होता. परमेश्वराने त्याचे नाव "अब्राहाम" ठेवले.

  • "अब्राम" या शब्दाचा अर्थ "महान पिता" असे आहे.
  • "अब्राहाम" याचा अर्थ "पुष्कळांचा पिता."
  • परमेश्वराने अब्राहामाला अभिवचन दिले की त्याच्याकडे अनेक संतती असतील, जो एक महान राष्ट्र बनेल.
  • अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली. परमेश्वराने अब्राहामाला खास्दी देश सोडून कनान देशात आणले.
  • अब्राहाम आणि त्याची बायको सारा फारच वृद्ध होती आणि कनान देशात राहत असताना त्यांना एक पुत्र, इसहाक झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: कनान, खास्दी, सारा, इसहाक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 04:06 कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या संतानांना वतन म्हणुन देईन.
  • 05:04 मग देवाने अब्रामाचे बदलून अब्राहाम असे ठेवले, याचा अर्थ “पुष्कळांचा पिता.”
  • 05:05 एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा व सारा 90 वर्षाची असतांना सारेने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला.
  • 05:06 जेंव्हा इसहाक तरूण झाला तेंव्हा देवाने अब्राहमाच्या विश्वासाची परिक्षा पाहाण्यासाठी, तो म्हणाला, “इसहाक, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घे व त्याचे मला होमार्पण कर.”
  • 06:01 जेंव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेंव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.
  • 06:04 ब-याच वर्षांनंतर, अब्राहाम मरण पावला व देवाने त्याला कराराच्या रुपाने दिलेली सर्व अभिवचने इसहाकाकडे सोपवण्यात आली.
  • 21:02 देवाने अब्राहामास असे वचन दिले की त्याच्या द्वारे जगातील सर्व कुळे आशिर्वादीत होतील.

Strong's

  • Strong's: H87, H85, G11