mr_tw/bible/names/cana.md

1.5 KiB

काना

व्याख्या:

काना हे एक गालील प्रांतातील गाव होते, जे नासरेथच्या उत्तरेला नऊ मैलावर वसलेले होते.

  • बारा शिष्यांपैकी एक नथनेल ह्याचे काना हे मूळ गाव होते.
  • येशू काना येथील लग्न समारंभात उपस्थित होता, आणि तेथे त्याने त्याचा पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षरस करून केला.
  • त्यानंतर काही कालांतराने, येशू काना येथे परत आला आणि तेथे तो कफर्णहुमच्या एका अधिकाऱ्याला भेटला, जो येशूला त्याच्या मुलाला बरे करण्याची विनंती करत होता.

(हे सुद्धा पहा: कफर्णहूम, गालील, बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G2580