mr_tw/bible/names/bethel.md

3.3 KiB

बेथेल

तथ्य:

बेथेल हे यरुशलेमच्या उत्तरेस वसलेले कनान मधील शहर होते. त्याला सुरवातीला लूज असे म्हंटले जात होते.

  • देवाचे वचन पहिल्यांदा मिळाल्यानंतर, अब्रामाने (अब्राहामाने) बेथेल जवळ देवासाठी एक वेदी बांधली. त्या वेळेपर्यंत, प्रत्यक्षात त्या शहराचे नाव बेथेल हे नव्हते, पण ते सामान्यपणे "बेथेल" असे संदर्भित केले जाते, जे बऱ्यापैकी प्रसिद्ध होते.
  • जेंव्हा याकोब त्याच्या भावापासून पाळला, तेंव्हा त्याने त्या शहराजवळ एक रात्र घालवली आणि तो त्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या जमिनीवर झोपला. जेंव्हा तो झोपेत होता, त्याने एक स्वप्न पहिले, ज्यामध्ये त्याने पहिले की स्वर्गदूत एका शिडीच्या सहाय्याने स्वर्गात वर आणि खाली करत होते.
  • जोपर्यंत याकोबाने तिचे नाव "बेथेल" ठेवले नाही, तोपर्यंत त्या शहराला हे नाव नव्हते. * हे स्पष्ट करण्यासाठी, काही भाषांतरे, अब्राहमच्या परिच्छेदामध्ये त्याच बरोबर (नाव बदलण्याच्या आधी) जेंव्हा याकोब तेथे आला, तेंव्हा त्याचे भाषांतर "लूज (नंतर बेथेल असे म्हंटले गेले)" असे करतात.
  • जुन्या करारामध्ये बेथेल ह्याचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे, आणि हे असे ठिकाण आहे जिथे अनेक महत्वाच्या घटना घडल्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, वेदी, याकोब, यरुशलेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1008