mr_tw/bible/kt/trust.md

5.6 KiB

विश्वास ठेवणे, विश्वास असणे, विश्वास ठेवला, विश्वासू, विश्वासार्हता

व्याख्या:

एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर "विश्वास ठेवणे" म्हणजे, ती व्यक्ती किंवा वस्तू सत्य आहे किंवा त्याच्यावर अवलंबून राहू शकतो हे खरे मानणे. त्या श्रद्धेला "विश्वास ठेवणे" असेही म्हटले जाते. एक "विश्वसनीय" व्यक्ती, असा व्यक्ती आहे, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि जे योग्य आणि सत्य आहे ते बोलू शकता, आणि म्हणूनच ज्याच्याकडे "विश्वासार्हता" हा गुण आहे.

  • विश्वास आणि भरवसा ह्यांचा जवळचा संबंध आहे. जर आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, तर आपल्याला भरवसा असतो की, त्या व्यक्तीने जे वचन दिले आहे तो ते पूर्ण करील.
  • एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे ह्याचा अर्थ त्या व्यक्तीवर अवलंबून राहणे असा होतो.
  • येशूवर "विश्वास असणे" ह्याचा अर्थ, तो देव आहे हे खरे मानणे, आपल्या पापांची भरपाई करण्यासाठी त्याने वधस्तंभावर प्राण दिला हे खरे मानणे, आणि आपल्याला सोडवण्यासाठी त्याच्यावर अवलंबून राहणे.
  • एक "विश्वसनीय म्हणणे" हा शब्द, असे काहीतरी जे सांगितले आहे ते सत्य असल्याचे मोजण्यात येऊ शकते हे सूचित करतो.

भाषांतर सूचना

  • "विश्वास ठेवणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "खरे मानणे" किंवा "विश्वास असणे" किंवा "आत्मविश्वास असणे" किंवा "अवलंबून असणे" ह्यांचा समावेश होतो.
  • "च्या वर तुमचा विश्वास ठेवा" ह्याचा "विश्वास ठेवा" ह्याच्या वाक्यप्रचाराशी अगदी समान अर्थ आहे.
  • "विश्वासार्हता" हा शब्द "विसंबण्याजोगा" किंवा "विश्वसनीय" किंवा "नेहमीच विश्वास ठेवला जाऊ शकतो" असा भाषांतरित केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: खरे मानणे, आत्मविश्वास, विश्वास, विश्वसनीय, खरे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:12 जेव्हा इस्राएलांनी पाहिले की मिसरी सैन्य मेले, तेव्हा त्यांनी देवावर व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याजवर विश्वास ठेवला.
  • 14:15 यहोशवा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.
  • 17:02 दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.
  • 34:06 तेंव्हा येशूने कांही लोकांस एक गोष्ट सांगितली जे स्वत:च्या चांगल्या कामावर भरवसा ठेवत व दूस-या लोकांना तुच्छ मानीत असत.

Strong's

  • Strong's: H539, H982, H1556, H2620, H2622, H3176, H4009, H4268, H7365, G1679, G3872, G3982, G4006, G4100, G4276