mr_tw/bible/kt/saint.md

2.4 KiB

पवित्रजण (संत)

व्याख्या:

"संत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "पवित्र असा कोणीएक" असा होतो आणि त्याचा संदर्भ येशूच्या विश्वासणाऱ्यांशी येतो.

  • नंतर मंडळींच्या इतिहासात, एखादा व्यक्ती जो त्याच्या चांगल्या कृत्यांसाठी ओळखला जातो, त्याला "पवित्रजण" हे शीर्षक देण्यात येत होते, पण नवीन कराराच्या काळात या शब्दाचा उपयोग असा केला जात नव्हता.
  • येशुमध्ये विश्वास ठेवणारे संत किंवा पवित्र जन होत, ते जे काही करतात त्यामुळे होत नाहीत, तर येशू ख्रिस्ताच्या तारणावरील श्रद्धेमुळे हे होते. तोच एक आहे जो त्यांना पवित्र बनवतो.

भाषांतर सूचना:

  • "संत" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "पवित्र असा एक" किंवा "पवित्र जण" किंवा "बाजूला केलेला असा कोणीएक" असे केले जाऊ शकते.
  • फक्त एकाच ख्रिस्ती समूहाला संदर्भित करेल, अशा शब्दाचा उपयोग होणार नाही ह्याची काळजी घ्या.

(हे सुद्धा पहाः पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H2623, H6918, H6922, G40