mr_tw/bible/kt/promise.md

5.1 KiB
Raw Permalink Blame History

वचन, वचने, वचन दिले

व्याख्या:

एक वचन म्हणजे काही विशिष्ठ गोष्टी करण्याची प्रतिज्ञा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी वचन देतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की तो काहीतरी करायला तयार आहे.

  • पवित्र शास्त्रामध्ये, देवाने त्याच्या लोकांना दिलेल्या अनेक वचनांच्या नोंदी आहेत.
  • वचने ही औपचारिक करारनाम्याचा एक महत्वाचा भाग आहे, जसे की करार.
  • बोललेली गोष्ट केली जाईल ह्याची पृष्टी करण्यासाठी, वचनाबरोबर सहसा शपथ दिली जाते.

भाषांतर सूचना

  • "वचन" या शब्दाचे भाषांतर "जबाबदारी" किंवा "खात्री" किंवा "हमी" असे केले जाऊ शकते.
  • "एखादी गोष्ट करण्याचे वाचन देणे" ह्याचे भाषांतर "एखाद्याला काहीतरी करण्याची खात्री देणे" किंवा "काहीतरी करण्यास प्रतिबद्ध असणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: करार, शपथ, प्रतिज्ञा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 03:15 देव बोलला, “मी वचन देतो येथूने पुढे मानवाच्या दुष्टाईमुळे भूमीला कधीही शाप देणार नाही, व पाण्याने जगाचा नाश करणार नाही, कारण मानव बाळपणापासुन पापी असतात.”Â<E2809D>
  • 03:16 मग देवाने पहिल्यांदा मेघधनुष्य बनवला व नोहा बरोबर करार केला. मेघधनुष्य जेंव्हा जेंव्हा आकाशात दिसते, तेंव्हा तेंव्हा देवाला मानवाबरोबर केलेल्या कराराची आठवण होते व त्याच्या लोकांनाही आठवण होते.
  • 04:08 देवाने अब्रामाला पुन्हा दर्शन देऊन म्हटले की त्याला पुत्र होईल व त्याची संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे होईल. अब्रामाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला.
  • 05:04 “तुझी पत्नी साराय हीस पुत्र होईल- तोच खरा वारसदार होईल.
  • 08:15 देवाने अब्राहमाशी केलेल्या कराराचे अभिवचन इसहाकाकडे, मग याकोब आणि त्याच्या बारा पुत्रांकडे व त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते.
  • 17:14 जरी दाविद देवाशी अविश्वासू राहिला होता तरीही देव आपले वचन पाळण्यासाठी दाविदाशी विश्वासू राहिला.
  • 50:01 येशूने आश्वासन दिले की तो युगाच्या शेवटी पुन्हा पृथ्वीवर येणार आहे. जरी तो अद्याप आला नाही, तरी तो आपले वचन पाळीलच.

Strong's

  • Strong's: H559, H562, H1696, H8569, G1843, G1860, G1861, G1862, G3670, G4279