mr_tw/bible/names/naaman.md

33 lines
3.2 KiB
Markdown

# नामान
## तथ्य:
जुन्या करारामध्ये, नामान हा अराम राजाच्या सैन्याचा सेनापती होता.
* नामानाला भयंकर त्वचेचा रोग होता, ज्याला कुष्टरोग असे म्हणतात, जो बरा होऊ शकत नव्हता.
* नामानाच्या घरातील एका यहुदी दासीने त्याला अलीशा संदेष्ट्याकडे जाऊन त्याला स्वतःला बरे करण्याबद्दल विचारण्यास सांगितले.
* अलीशाने नामानाला यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले. जेंव्हा नामानाने ऐकले, तेंव्हा देवाने त्याला त्याच्या रोगापासून बरे केले.
* ह्याचा परिणाम म्हणून नामान एकाच देवावर, यहोवावर, विश्वास ठेवू लागला.
नामान नावाचे इतर दोन मनुष्य हे याकोबाचा मुलगा बन्यामीन ह्याचे वंशज होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [अराम](../names/aram.md), [यार्देन नदी](../names/jordanriver.md), [कुष्टरोग](../other/leprosy.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 08:6-7](rc://*/tn/help/1ch/08/06)
* [2 राजे 05:1](rc://*/tn/help/2ki/05/01)
* [लुक 04:27](rc://*/tn/help/luk/04/25)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[19:14](rc://*/tn/help/obs/19/14)__ यापैकी एक चमत्कार शत्रू सेनापती __नामान__ याला घडला, ज्याला त्वचेचा भयानक आजार होता.
* __[19:15](rc://*/tn/help/obs/19/15)__ सुरवातीला __नामन__ रागावला होता आणि तो मूर्खपणासारखा वाटला म्हणून ते करणार नाही. पण नंतर त्याने आपला विचार बदलला आणि सात वेळा जॉर्डन नदीत बुडवून घेतले.
* __[२६:६](rc://*/tn/help/obs/26/06)__ "त्याने (एलीशा) फक्त इस्रायलच्या शत्रूंचा सेनापती __नामान__ याच्या त्वचेचा रोग बरा केला."
## शब्द माहिती:
* Strong's: H5283, G3497