3.1 KiB
3.1 KiB
यहूदा
तथ्य:
यहूदा हा याकोबाचा चौथा मुलगा होता. तो लेआचा चौथा मुलगा होता. त्याचे वंशज इस्राएलाच्या कुळापैकी एक बनले.
- त्याच्यापासून आलेले कुळ "यहूदाचे वंश" किंवा "यहूदा" म्हणून ओळखले जात असे.
- त्याचे नाव इब्री शब्दासारखे वाटते ज्याचा अर्थ "स्तुती" असा आहे.
- यहूदाचा वंश यरुशलेम शहराच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशासह कनानच्या दक्षिण भागात स्थायिक झाला. भुमीच्या प्रदेशाचे नाव म्हणून वापरल्यास, "यहूदा" हा शब्द यहूदा वंशाला दिलेल्या भुमिला संदर्भित करतो
- जुन्या करारात, यहूदा हे नाव कधीकधी इस्राएलाच्या संपूर्ण दक्षिणी राज्याला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते (एफ्राइम हे नाव कधीकधी संपूर्ण उत्तर राज्याला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते त्याप्रमाणे).
- दावीद राजा, शलमोन राजा, आणि दक्षिणेकडील राज्याचे सर्व राजे यहूदाचे वंशज होते. येशू देखील यहूदाचा वंशज होता.
- “यहुदा” आणि “यहुदा” ही नावे “यहुदा” या नावापासून येतात.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: इस्त्राएलाचे बारा वंश, यहुदा (राज्य), यहुदी, यहुदा, याकोब, लेआ)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच3063