3.2 KiB
3.2 KiB
बेथेलहेम, एफ्राथा
तथ्य:
बेथलेहेम हे इस्राएलमधील यरुशलेमच्या नगराजवळील एक लहान शहर होते. त्यास "एफ्राथा" या नावाने सुद्धा ओळखले जात असे, जे कदाचित त्याचे मूळ नाव असावे.
- बेथलेहेम या शहराला "दाविदाचे नगर" असेही म्हणतात, कारण दावीद राजाचा जन्म तेथे झाला होता.
- मीखा संदेष्ट्याने सांगितले होते की, मसीहा "बेथलेहेम एफफ्राथ" येथून येईल.
- या भविष्यवाणी पुर्ण होत, अनेक वर्षांनंतर, येशूचा जन्म बेथलेहेमात झाला.
- बेथलेहेम या नावाचा अर्थ "भाकरीचे घर" किंवा "अन्नाचे घर" असा होतो.
(हे सुद्धा पाहा: कालेब, दावीद, मीखा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- १७:२ दावीद हा बेथेलहेम नगरातील मेंढपाळ होता.
- २१:९ यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की एका कुमारीकेच्या पोटी मसिहाचा जन्म होईल. मीखा संदेष्ट्याने सांगितले की बेथेलहेम नगरामध्ये मसीहाचा जन्म होईल.
- २३:४ योसेफ आणि मरीया यांना ते राहत असलेल्या नासरेथहून बेथेलहेम असा प्रवास करावा लागला, कारण बेथेलहेम नगराचा होता.
- २३:६ "बेथेलहेम नगरामध्ये मसीहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!”
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच376, एच672, एच1035, जी965