mr_tw/bible/names/barnabas.md

35 lines
3.9 KiB
Markdown

# बर्णबा
## तथ्य:
प्रेषितांच्या काळातील सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांपैकी बर्णबा एक होता.
* बर्णबा हा कुप्र बेटावर जन्मलेला इस्त्राएलाच्या लेवी वंशातील होता.
* जेंव्हा शौल (पौल) ख्रिस्ती झाला, तेव्हा बर्णबा याने इतर विश्वासू बांधवांना त्याला एक बंधू म्हणून स्वीकारण्यास विनंती केली.
* बर्णबा आणि पौलाने येशूविषयी सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये एकत्र प्रवास केला.
* त्याचे नाव योसेफ होते, परंतु त्याला "बर्णबा" असे म्हटले जात असे, ज्याचा अर्थ "बोधपुत्र" असा होतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [ख्रिस्ती](../kt/christian.md), [कुप्र](../names/cyprus.md), [शुभ वार्ता](../kt/goodnews.md), [लेवी](../names/levite.md), [पौल](../names/paul.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 4:36](rc://*/tn/help/act/04/36)
* [प्रेषितांची कृत्ये 11:26](rc://*/tn/help/act/11/25)
* [प्रेषितांची कृत्ये 13:3](rc://*/tn/help/act/13/01)
* [प्रेषितांची कृत्ये 15:33](rc://*/tn/help/act/15/33)
* [कलस्सै 4:10-11](rc://*/tn/help/col/04/10)
* [गलतीकरांस पत्र 2:9-10](rc://*/tn/help/gal/02/09)
* [गलतीकरांस पत्र 2:13-14](rc://*/tn/help/gal/02/13)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[46:8](rc://*/tn/help/obs/46/08)__ तेव्हा __बर्णबा__ नावाच्या एका विश्वासणाऱ्याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला.
* __[46:9](rc://*/tn/help/obs/46/09)__ __बर्णबा__ आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठ तेथे गेले.
* __[46:10](rc://*/tn/help/obs/46/10)__ एके दिवशी, अंत्युखियाचे ख्रिस्ती लोक उपवास-प्रार्थना करत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, "__बर्णबा__ व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा." तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व __बर्णबासाठी__ प्रार्थना केली व त्यांच्यावर आपले हात ठेविले.
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: G09210