3.9 KiB
3.9 KiB
बर्णबा
तथ्य:
प्रेषितांच्या काळातील सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांपैकी बर्णबा एक होता.
- बर्णबा हा कुप्र बेटावर जन्मलेला इस्त्राएलाच्या लेवी वंशातील होता.
- जेंव्हा शौल (पौल) ख्रिस्ती झाला, तेव्हा बर्णबा याने इतर विश्वासू बांधवांना त्याला एक बंधू म्हणून स्वीकारण्यास विनंती केली.
- बर्णबा आणि पौलाने येशूविषयी सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये एकत्र प्रवास केला.
- त्याचे नाव योसेफ होते, परंतु त्याला "बर्णबा" असे म्हटले जात असे, ज्याचा अर्थ "बोधपुत्र" असा होतो.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: ख्रिस्ती, कुप्र, शुभ वार्ता, लेवी, पौल)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 4:36
- प्रेषितांची कृत्ये 11:26
- प्रेषितांची कृत्ये 13:3
- प्रेषितांची कृत्ये 15:33
- कलस्सै 4:10-11
- गलतीकरांस पत्र 2:9-10
- गलतीकरांस पत्र 2:13-14
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 46:8 तेव्हा बर्णबा नावाच्या एका विश्वासणाऱ्याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला.
- 46:9 बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठ तेथे गेले.
- 46:10 एके दिवशी, अंत्युखियाचे ख्रिस्ती लोक उपवास-प्रार्थना करत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा." तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर आपले हात ठेविले.
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: G09210