mr_tw/bible/names/abiathar.md

25 lines
1.8 KiB
Markdown

# अब्याथार
## व्याख्या:
दावीद राजाच्या काळात अब्याथार हा इस्राएलाचा महायाजक होता.
* शौल राजाने जेव्हा याजकांना ठार मारले, तेव्हा अब्याथार पळून रानात दाविदाकडे गेला.
* अब्याथार आणि सादोक नावाच्या आणखी एका महायाजकाने दावीदाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विश्वासाने त्याची सेवा केली.
* दाविदाच्या मृत्यूनंतर, अब्याथारने शलमोनाऐवजी अदोनियाला राजा बनविण्याच्या प्रयत्नात मदत केली.
* या कारणास्तव, शलमोन राजाने अब्याथारला याजक पदावरून काढून टाकले.
(हे देखील पाहा [सादोक](../names/zadok.md), [शौल](../names/saul.md), [दावीद](../names/david.md), [शलमोन](../names/solomon.md), [अदोनीया](../names/adonijah.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 27:32-34](rc://*/tn/help/1ch/27/32)
* [1 राजे 1:7](rc://*/tn/help/1ki/01/07)
* [1 राजे 2:22-23](rc://*/tn/help/1ki/02/22)
* [2 शमुवेल 17:15](rc://*/tn/help/2sa/17/15)
* [मार्क 2:25-26](rc://*/tn/help/mrk/02/25)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग्स: एच54, जी8