1.8 KiB
1.8 KiB
अब्याथार
व्याख्या:
दावीद राजाच्या काळात अब्याथार हा इस्राएलाचा महायाजक होता.
- शौल राजाने जेव्हा याजकांना ठार मारले, तेव्हा अब्याथार पळून रानात दाविदाकडे गेला.
- अब्याथार आणि सादोक नावाच्या आणखी एका महायाजकाने दावीदाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विश्वासाने त्याची सेवा केली.
- दाविदाच्या मृत्यूनंतर, अब्याथारने शलमोनाऐवजी अदोनियाला राजा बनविण्याच्या प्रयत्नात मदत केली.
- या कारणास्तव, शलमोन राजाने अब्याथारला याजक पदावरून काढून टाकले.
(हे देखील पाहा सादोक, शौल, दावीद, शलमोन, अदोनीया)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग्स: एच54, जी8