mr_tw/bible/kt/vow.md

2.5 KiB

नवस

व्याख्या:

एक "नवस" एक गंभीर वचन किंवा शपथ आहे जी एखादी व्यक्ती देवाला देते.

  • जर प्राचीन इस्राएलमधील एखाद्या व्यक्तीने देवाला नवस केला तर त्या व्यक्तीला नवस पूर्ण करणे बंधनकारक होते. प्राचीन इस्राएली लोकांचा असा विश्वास होता की एखाद्या व्यक्तीने केलेला नवस पुर्ण केला नाही तर देव त्याला शिक्षा करतो.
  • प्राचीन इस्राएलमध्ये, कधीकधी एखादी व्यक्ती देवाला त्याच्या संरक्षणासाठी किंवा नवस करण्याच्या बदल्यात त्याची तरतूद करण्याची विनंती करत असे. तथापि, प्राचीन इस्राएली लोकांचा विश्वास नव्हता की या विनंत्या पूर्ण करण्यासाठी देव बांधील आहे
  • संदर्भानुसार, "नवस" या संज्ञेचे भाषांतर "गंभीर वचन" किंवा "गंभीर शपथ" किंवा "देवाला दिलेले वचन" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: वचन, शपथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच5087, एच5088, जी171