mr_tw/bible/kt/promise.md

5.2 KiB
Raw Permalink Blame History

वचन, वचन दिले

व्याख्या:

जेव्हा क्रियापद म्हणून वापरला जातो तेव्हा, “अभिवचन” हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या कृतीचा संदर्भ देतो की तो असे काही करेल की त्याने जे सांगितले ते पूर्ण करण्यास तो स्वतःला बांधील आहे. एक संज्ञा म्हणून वापरल्यास, "अभिवचन" हा शब्द एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करण्यासाठी स्वत: ला बंधनकारक करतो

  • पवित्र शास्त्रात देवाने आपल्या लोकांना दिलेल्या अनेक अभिवचनांची नोंद आहे.
  • अभिवचने कराराप्रमाणे औपचारिक वचनांचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

भाषांतरातील सूचना:

  • "वचन" या शब्दाचे भाषांतर "वचनबद्धता" किंवा "आश्वासन" किंवा "हमी" असे केले जाऊ शकते
  • "काहीतरी करण्याचे वचन देणे” असे भाषांतर केले जाऊ शकते "एखाद्याला आश्वासन द्या की आपण काहीतरी कराल" किंवा “काहीतरी करण्यास वचनबद्ध व्हा."

(हे देखील पाहा: करार, शपथ, नवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 3:15 देव म्हणाला, "मी अभिवचन देतो की लोकांनी वाईट गोष्टी केल्यामुळे मी पुन्हा कधीही पृथ्वीला शाप देणार नाही, किंवा प्रलयाने जगाचा नाश करणार नाही, जरी लोक बालक असल्यापासून पापी असले तरीही. "
  • 3:16 त्यानंतर देवाने त्याच्या अभिवचनाचे प्रथम चिन्ह म्हणून इंद्रधनुष्य बनविला. प्रत्येक वेळी इंद्रधनुष्य आकाशात दिसू लागल्यावर देवाला त्याने केलेल्या अभिवचनाची आठवण होत असेल आणि त्याच्या लोकांनाही ते आठवत असेल.
  • 4:8 देव अब्रामाशी बोलला आणि पुन्हा अभिवचन दिले की त्याला मुलगा होईल आणि आकाशातील तारे इतके त्याचे संतती होईल. अब्रामाचा विश्वास देवाच्या अभिवचनावर होता.
  • 5:4 "तुझी पत्नी सारा हिला पुत्र होईल तो अभिवचनाचा पुत्र होईल."
  • 8:15 देवाने अब्राहामाला दिलेले कराराचे अभिवचने इसहाक, त्यानंतर याकोब आणि त्यानंतर याकोबाचे बारा मुलगे व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले.
  • 17:14 दाविद देवाशी अविश्वासु ठरला असला तरी देव अजूनही त्याला दिलेल्या अभिवचनाबद्दल विश्वासू होता.
  • 50:1 येशूने अभिवचन दिले की तो जगाच्या शेवटी परत येईल. तो अद्याप परत आला नसला तरी, तो आपले अभिवचन पाळेल.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0559, H0562, H1696, H8569, G18430, G18600, G18610, G18620, G36700, G42790