mr_tw/bible/kt/scribe.md

2.7 KiB

नियमशास्त्राचे शिक्षक

व्याख्या:

शास्त्री हे अधिकृत अधिकारी होते, जे महत्वाचे शासकीय किंवा धार्मिक कागदपत्रे हाताने लिहिण्यास किंवा नक्कल करण्यास जबाबदार होते. यहुदी शास्त्री ह्यांच्यासाठीचे दुसरे नाव "यहुदी नियमशास्त्रातील तज्ञ" हे होते.

  • जुन्या कराराच्या पुस्तकांची कॉपी आणि जतन करण्यासाठी लेखक जबाबदार होते.
  • त्यांनी धार्मिक मते आणि देवाच्या नियमावर भाष्य देखील कॉपी केले, जतन केले आणि त्याचा अर्थ लावला.
  • काही वेळा, शास्त्री हे महत्त्वाचे सरकारी अधिकारी होते.
  • महत्त्वाच्या बायबलसंबंधी शास्त्रींमध्ये बारूख आणि एज्रा यांचा समावेश होतो.
  • नवीन करारात, “शास्त्री” या शब्दाचे भाषांतर “नियमशास्त्राचे शिक्षक” असे देखील केले गेले.
  • नवीन करारात, शास्त्री हे सहसा “परुशी” नावाच्या धार्मिक गटाचा भाग होते आणि दोन्ही गटांचा वारंवार उल्लेख केला जात असे.

(हे देखील पाहा: कायदा, परुशी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच5608, एच5613, एच7083, जी11220