2.6 KiB
2.6 KiB
परुशी
तथ्य:
परुशी हे येशूच्या काळातील यहुदी धार्मिक नेत्यांचा एक महत्त्वाचा, शक्तिशाली गट होता.
- त्यांच्यापैकी बरेच मध्यमवर्गीय व्यापारी होते तर काही पुजारीही होते.
- सर्व ज्यू नेत्यांपैकी परुशी हे मोशेचे नियम आणि इतर यहुदी कायदे आणि परंपरांचे पालन करण्यात सर्वात कठोर होते.
- ते यहुदी लोकांना त्यांच्या सभोवतालच्या विदेशी लोकांच्या प्रभावापासून अलिप्त ठेवण्याबद्दल खूप चिंतित होते. "पराशी" हे नाव "वेगळे" या शब्दावरून आले आहे.
- परुशांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता; त्यांचा देवदूत आणि इतर आध्यात्मिक प्राण्यांच्या अस्तित्वावरही विश्वास होता.
- परुशी आणि सदूकी यांनी येशू आणि सुरुवातीच्या ख्रिश्चनांचा सक्रियपणे विरोध केला.
(हे देखील पाहा: परिषद(मंडळी), यहुदी पुढारी, नियमशास्त्र, सदुकी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 26:4
- योहान 3:1-2
- लुक 11:44
- मत्तय 3:7
- मत्तय 5:20
- मत्तय 9:11
- मत्तय 12:2
- मत्तय 12:38
- फिलीप्पेकरास पत्र 3:5
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: जी53300