mr_tw/bible/kt/pharisee.md

30 lines
2.6 KiB
Markdown

# परुशी
## तथ्य:
परुशी हे येशूच्या काळातील यहुदी धार्मिक नेत्यांचा एक महत्त्वाचा, शक्तिशाली गट होता.
* त्यांच्यापैकी बरेच मध्यमवर्गीय व्यापारी होते तर काही पुजारीही होते.
* सर्व ज्यू नेत्यांपैकी परुशी हे मोशेचे नियम आणि इतर यहुदी कायदे आणि परंपरांचे पालन करण्यात सर्वात कठोर होते.
* ते यहुदी लोकांना त्यांच्या सभोवतालच्या विदेशी लोकांच्या प्रभावापासून अलिप्त ठेवण्याबद्दल खूप चिंतित होते. "पराशी" हे नाव "वेगळे" या शब्दावरून आले आहे.
* परुशांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता; त्यांचा देवदूत आणि इतर आध्यात्मिक प्राण्यांच्या अस्तित्वावरही विश्वास होता.
* परुशी आणि सदूकी यांनी येशू आणि सुरुवातीच्या ख्रिश्चनांचा सक्रियपणे विरोध केला.
(हे देखील पाहा: [परिषद(मंडळी)](../other/council.md), [यहुदी पुढारी](../other/jewishleaders.md), [नियमशास्त्र](../kt/lawofmoses.md), [सदुकी](../kt/sadducee.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 26:4](rc://*/tn/help/act/26/04)
* [योहान 3:1-2](rc://*/tn/help/jhn/03/01)
* [लुक 11:44](rc://*/tn/help/luk/11/43)
* [मत्तय 3:7](rc://*/tn/help/mat/03/07)
* [मत्तय 5:20](rc://*/tn/help/mat/05/19)
* [मत्तय 9:11](rc://*/tn/help/mat/09/10)
* [मत्तय 12:2](rc://*/tn/help/mat/12/01)
* [मत्तय 12:38](rc://*/tn/help/mat/12/38)
* [फिलीप्पेकरास पत्र 3:5](rc://*/tn/help/php/03/04)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: जी53300