mr_tw/bible/kt/sanctify.md

31 lines
3.7 KiB
Markdown

# पवित्र करणे, पवित्रीकरण
## व्याख्या:
पवित्र करणे म्हणजे बाजूला करणे किंवा पवित्र बनविणे. पवित्रीकरण ही पवित्र बनण्याची प्रक्रिया आहे.
* जुन्या करारात, काही लोक आणि गोष्टी देवाच्या सेवेसाठी पवित्र केल्या गेल्या किंवा वेगळ्या केल्या गेल्या.
* नवीन करार शिकवतो की देव येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पवित्र करतो. म्हणजेच, तो त्यांना पवित्र करतो आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना वेगळे करतो.
* येशूवर विश्वास ठेवणार्‍यांना देखील स्वतःला देवासाठी पवित्र करण्याची, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत पवित्र राहण्याची आज्ञा देण्यात आली आहे.
## भाषांतर सूचना:
* संदर्भावर आधारित, "पवित्र करणे" या शब्दाचे भाषांतर "बाजूला करणे" किंवा "पवित्र बनवणे" किंवा "शुद्ध करणे" असे केले जाऊ शकते.
* जेव्हा लोक स्वतःला पवित्र करतात, तेंव्हा ते स्वतःला शुद्ध करतात, आणि देवाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. बऱ्याचदा "समर्पित करणे" या शब्दाचा उपयोग या अर्थासाठी पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
* जेव्हा ह्याचा अर्थ "समर्पित करणे" असा होतो, तेव्हा या शब्दाचे भाषांतर, "देवाच्या सेवेसाठी एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
* संदर्भावर आधारित, "तुमचे पवित्रीकरण" ह्याचे भाषांतर "तुम्हाला पवित्र बनविणे" किंवा "(देवासाठी) बाजूला करणे" किंवा "जे तुम्हाला पवित्र बनवणे" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [समर्पित करणे](../kt/consecrate.md), [पवित्र](../kt/holy.md), [बाजूला करणे](../kt/setapart.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 4:3-6](rc://*/tn/help/1th/04/03)
* [2 थेस्सलनीकाकरांस पत्र 2:13](rc://*/tn/help/2th/02/13)
* [उत्पत्ति 2:1-3](rc://*/tn/help/gen/02/01)
* [लुक 11:2](rc://*/tn/help/luk/11/02)
* [मत्तय 6:8-10](rc://*/tn/help/mat/06/08)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच6942, जी00370, जी00380