3.7 KiB
3.7 KiB
पवित्र करणे, पवित्रीकरण
व्याख्या:
पवित्र करणे म्हणजे बाजूला करणे किंवा पवित्र बनविणे. पवित्रीकरण ही पवित्र बनण्याची प्रक्रिया आहे.
- जुन्या करारात, काही लोक आणि गोष्टी देवाच्या सेवेसाठी पवित्र केल्या गेल्या किंवा वेगळ्या केल्या गेल्या.
- नवीन करार शिकवतो की देव येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पवित्र करतो. म्हणजेच, तो त्यांना पवित्र करतो आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना वेगळे करतो.
- येशूवर विश्वास ठेवणार्यांना देखील स्वतःला देवासाठी पवित्र करण्याची, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत पवित्र राहण्याची आज्ञा देण्यात आली आहे.
भाषांतर सूचना:
- संदर्भावर आधारित, "पवित्र करणे" या शब्दाचे भाषांतर "बाजूला करणे" किंवा "पवित्र बनवणे" किंवा "शुद्ध करणे" असे केले जाऊ शकते.
- जेव्हा लोक स्वतःला पवित्र करतात, तेंव्हा ते स्वतःला शुद्ध करतात, आणि देवाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. बऱ्याचदा "समर्पित करणे" या शब्दाचा उपयोग या अर्थासाठी पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
- जेव्हा ह्याचा अर्थ "समर्पित करणे" असा होतो, तेव्हा या शब्दाचे भाषांतर, "देवाच्या सेवेसाठी एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
- संदर्भावर आधारित, "तुमचे पवित्रीकरण" ह्याचे भाषांतर "तुम्हाला पवित्र बनविणे" किंवा "(देवासाठी) बाजूला करणे" किंवा "जे तुम्हाला पवित्र बनवणे" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: समर्पित करणे, पवित्र, बाजूला करणे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: एच6942, जी00370, जी00380