3.7 KiB
3.7 KiB
पुनःस्थापन करणे, पुनःस्थापना
व्याख्या:
"पुनर्स्थापना करणे" आणि "पुनर्स्थापना" या संज्ञा अर्थ एखाद्या गोष्टीला त्याच्या मूळ स्थानावर किंवा स्थितीकडे परत आणणे आहे.
- जेंव्हा रोगग्रस्त झालेल्या एखाद्या अवयवाला पुनर्संचयित केला जातो, तेंव्हा त्याचा अर्थ तो भाग "बरा झाला" असा होतो.
- एक तुटलेले नातेसंबंध, ज्याची पुनःस्थापना केली जाते, म्हणजे त्यांच्यात "समेट घडवून आणला जातो." देव पापमय लोकांची पुनःस्थापना करतो आणि त्यांना त्याच्याकडे परत आणतो.
- जर लोकांना त्यांच्या मूळ देशात पुनर्स्थापित केले असेल तर, त्यांना त्या देशात "परत आणले" गेले किंवा "परत आले" आहे.
भाषांतर सूचना:
- संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "नवीकरण करणे" किंवा "परतफेड करणे" किंवा "परत करणे" किंवा "बरे करणे" किंवा "परत आणणे" ह्यांचा समावेश असू शकतो.
- या संज्ञांसाठी इतर अभिव्यक्ती, "नवीन बनवणे" किंवा "नवीन असल्यासारखे पुन्हा बनवणे" या असू शकतात.
- जेंव्हा मालमत्तेची "पुनःस्थापना केली" जाते, तेंव्हा तिला "दुरुस्त केले जाते" किंवा "बदलले जाते" किंवा "तीच्या मालकाला "परत दिले" जाते.
- संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" याचे भाषांतर "नुतनीकरण" किंवा "आरोग्य" किंवा "समेट" असे केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- २ राजे ५:१०
- प्रेषितांची कृत्ये ३:२१
- प्रेषितांची कृत्ये १५:१५-१८
- यशया ४९:५-६
- यिर्मया १५:१९-२१
- विलापगीत ५:२२
- लेवीय ६:५-७
- लुक १९:८
- मत्तय १२:१३
- स्तोत्र ८०:१-३
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच7725, एच7999, एच8421, जी06000, जी26750