mr_tw/bible/kt/predestine.md

2.2 KiB

पूर्वनियोजित, पूर्वी नेमलेले

व्याख्या:

"पूर्वनियोजित" आणि "पूर्वी नेमलेले" या संज्ञा एखादी गोष्ट घडण्याच्या आधी निर्णय घेणे किंवा नियोजन करणे यास संदर्भित करतात.

  • ही संज्ञा विशेषकरून लोकांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून देव पूर्वनियोजन करतो, यास संदर्भित करते.
  • काहीवेळा "अगोदर नेमलेला" या शब्दाचा उपयोग केला जातो, ज्याचा अर्थ आधी निर्णय घेण्याशी येतो.

भाषांतर सूचना:

  • "पूर्वनियोजित" या संज्ञेचे भाषांतर, "आधी ठरविणे" किंवा "वेळेच्या आधीच निर्णय घेणे" असे केले जाऊ शकते.
  • "पूर्वी नेमलेले" या संज्ञेचे भाषांतर, "खूप आधीच ठरविलेले" किंवा "वेळेच्या आधीच योजिलेले" किंवा " वेळेच्या आधीच निर्णय घेतलेले" असे केले जाऊ शकते.
  • या संज्ञेचे भाषांतर, "पूर्वज्ञान" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असावे, ह्याची नोंद घ्या.

(हे देखील पाहा: पूर्वज्ञान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: G43090