mr_tw/bible/kt/perish.md

34 lines
3.7 KiB
Markdown

# नाश होणे
## व्याख्या:
सहसा हिंसा किंवा आपत्तीचा परिणाम म्हणून, "नाश" या शब्दाचा अर्थ मरणे किंवा नष्ट होणे असा आहे. नवीन करारामध्ये, त्याचा हरवणे किंवा देवाच्या लोकांपासून विभक्त होणे असा आध्यात्मिक अर्थ आहे.
### "नाश होणे" या वाक्याशाचा आध्यात्मिक अर्थ:
* जे लोक "नष्ट होत आहेत" ते असे लोक आहेत ज्यांनी आपल्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे.
* जे "नाश पावतात" ते स्वर्गात देवाबरोबर अनंतकाळ राहणार नाहीत. त्याऐवजी, ते देवाच्या शिक्षेखाली नरकामध्ये अनंतकाळ राहतील.
* प्रत्येकजण शारीरिकरित्या मरण पावेल, परंतु जे लोक आपल्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना कायमची शिक्षा होईल.
* जेव्हा "नाश" हा शब्द आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो, तेव्हा खात्री करा की तुमचे भाषांतर हे शारीरिकरित्या मरण्यापेक्षा वेगळ्या प्रकारे व्यक्त करते.
## भाषांतर सूचना:
* संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "देवाच्या लोकांपासून ताटातूट होणे," किंवा "अनंतकाळासाठी मरणे" किंवा 'नरकात नाश होणे" किंवा "नष्ट होणे" यांचा समावेश असू शकतो.
* एखादा शब्द किंवा अभिव्यक्ती वापरण्याचा प्रयत्न करा ज्याचा अर्थ केवळ "शारीरिकरित्या मरणे" किंवा "अस्तित्व थांबणे" असा होत नाही.
(हे देखील पाहा: [मृत्यू](../other/death.md), [अनंतकाळ](../kt/eternity.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 पेत्र 1:23](rc://*/tn/help/1pe/01/22)
* [2 करिंथकरांस पत्र 2:16-17](rc://*/tn/help/2co/02/16)
* [2 थेस्सलनीकाकरांस पत्र 2:10](rc://*/tn/help/2th/02/08)
* [यिर्मया 18:18](rc://*/tn/help/jer/18/18)
* [स्तोत्र 49:18-20](rc://*/tn/help/psa/049/018)
* [जखऱ्या 9:5-7](rc://*/tn/help/zec/09/05)
* [जखऱ्या 13:8](rc://*/tn/help/zec/13/08)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच0006, एच0007, एच0008, एच1478, एच1820, एच1826, एच5486, एच5595, एच6544, एच8045, जी05990, जी06220, जी06840, जी08530, जी13110, जी27040, जी48810, जी53560