mr_tw/bible/kt/perish.md

3.7 KiB

नाश होणे

व्याख्या:

सहसा हिंसा किंवा आपत्तीचा परिणाम म्हणून, "नाश" या शब्दाचा अर्थ मरणे किंवा नष्ट होणे असा आहे. नवीन करारामध्ये, त्याचा हरवणे किंवा देवाच्या लोकांपासून विभक्त होणे असा आध्यात्मिक अर्थ आहे.

"नाश होणे" या वाक्याशाचा आध्यात्मिक अर्थ:

  • जे लोक "नष्ट होत आहेत" ते असे लोक आहेत ज्यांनी आपल्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे.
  • जे "नाश पावतात" ते स्वर्गात देवाबरोबर अनंतकाळ राहणार नाहीत. त्याऐवजी, ते देवाच्या शिक्षेखाली नरकामध्ये अनंतकाळ राहतील.
  • प्रत्येकजण शारीरिकरित्या मरण पावेल, परंतु जे लोक आपल्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना कायमची शिक्षा होईल.
  • जेव्हा "नाश" हा शब्द आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो, तेव्हा खात्री करा की तुमचे भाषांतर हे शारीरिकरित्या मरण्यापेक्षा वेगळ्या प्रकारे व्यक्त करते.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "देवाच्या लोकांपासून ताटातूट होणे," किंवा "अनंतकाळासाठी मरणे" किंवा 'नरकात नाश होणे" किंवा "नष्ट होणे" यांचा समावेश असू शकतो.
  • एखादा शब्द किंवा अभिव्यक्ती वापरण्याचा प्रयत्न करा ज्याचा अर्थ केवळ "शारीरिकरित्या मरणे" किंवा "अस्तित्व थांबणे" असा होत नाही.

(हे देखील पाहा: मृत्यू, अनंतकाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0006, एच0007, एच0008, एच1478, एच1820, एच1826, एच5486, एच5595, एच6544, एच8045, जी05990, जी06220, जी06840, जी08530, जी13110, जी27040, जी48810, जी53560