mr_tw/bible/kt/jealous.md

4.2 KiB

ईर्ष्यावान, ईर्ष्या

व्याख्या:

"ईर्ष्यावान" आणि "ईर्ष्या" या शब्दांचा संदर्भ नातेसंबंधाची शुद्धता राखण्याची तीव्र इच्छा ह्याच्याशी आहे. ते एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्याचा ताबा ठेवण्याच्या तीव्र इच्छेचा देखील संदर्भ घेऊ शकतात.

  • या शब्दांचा उपयोग सहसा त्यांच्या विवाहातील अविश्वासू जोडीदाराच्या प्रती एखाद्या व्यक्तीच्या क्रोधीत भावनांचे वर्णन करण्याकरिता करतात.
  • जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये वापरले जातात, तेव्हा हा शब्द देवाची त्याच्या लोकांनी पापापासून शुद्ध आणि निष्कलंक राहण्याच्या तीव्र इच्छेला संदर्भित करतो.
  • देव त्याच्या नावाबद्दल देखील "ईर्ष्यावान" आहे, त्याची इच्छा आहे की त्याचे नाव सन्मानाने आणि आदराने घेतले पाहिजे.
  • ईर्ष्यावान होण्याचा आणखी एक अर्थ एखादा अतिशय यशस्वी किंवा प्रसिद्ध झाल्याबद्दल क्रोधीत होणे असा होतो. हे "मत्सर" या शब्दाच्या अर्थाच्या अगदी जवळ आहे.

भाषांतर सूचना:

  • "ईर्ष्यावान" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "मजबूत संरक्षणात्मक इच्छा" किंवा "स्वार्थी इच्छा" ह्यांचा समावेश होतो.
  • "ईर्ष्या" या शब्दाचे भाषांतर "मजबूत संरक्षणात्मक भावना" किंवा "स्वार्थी भावना" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा देवाबद्दल बोलले जाते, या शब्दांचे भाषांतर करताना त्याचा अर्थ एखाद्याबद्दल संतप्त झाल्याचा नकारात्मक अर्थ दिला जाणार नाही ह्याची खात्री करा.
  • इतर लोक जे अतिशय यशस्वी आहेत त्यांच्याप्रती लोकांच्या क्रोधाच्या चुकीच्या भावनेच्या संदर्भामध्ये, "मत्सरी" आणि "मत्सर" या शब्दांचा उपयोग केला जाऊ शकतो. पण या शब्दांचा उपयोग देवाबद्दल होता कामा नये.

(हे देखील पाहा: मत्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H7065, H7067, H7068, H7072, G22050, G38630