mr_tw/bible/kt/innocent.md

38 lines
4.6 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains ambiguous Unicode characters

This file contains Unicode characters that might be confused with other characters. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# निर्दोष
## व्याख्या:
"निर्दोष" या संज्ञेचा अर्थ एखाद्या अपराधामध्ये किंवा इतर चुकीच्या गोष्टीमध्ये दोषी नसणे असा होतो. हे सर्वसामान्यपणे वाईट गोष्टींमध्ये सहभागी नसलेल्या लोकांसाठी देखील संदर्भित केले जाऊ शकते.
* काहीतरी चुकीचे केले असा दोष एखाद्यावर लावला असेल, आणि जर त्या व्यक्तीने काहीच चुकीचे केले नसेल तर त्याला निर्दोष असे म्हणतात.
* काहीवेळा "निर्दोष" ही संज्ञा अशा लोकांना संदर्भित करते, ज्या लोकांना वाईट वागणूक मिळावी असे त्यांनी काहीच केलेले नसते, तरीही ती त्यांना मिळत असते, जसे की, शत्रू सैन्याच्या हल्ल्यामधील "निर्दोष लोक."
* बायबलमध्ये, "रक्त" "हत्या" यास दर्शवू शकते, म्हणून "निष्पाप रक्त" म्हणजे "अशा लोकांना ठार मारणे जे मरण्यास पात्र नव्हते."
## भाषांतर सूचना:
* बऱ्याच संदर्भामध्ये, "निर्दोष" या शब्दाचे भाषांतर "दोषी नसलेला" किंवा "जबाबदार नसलेला" किंवा कशासाठीही "दोष न लागलेला" असे केले जाऊ शकते.
* साधारणपणे निर्दोष लोकांचा संदर्भ देताना, या संज्ञेचे भाषांतर "ज्याने काहीच चुकी केली नाही" किंवा "जो वाईटामध्ये सामील नव्हता" असे केले जाऊ शकते.
* "निर्दोष रक्त पाडणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "अशा लोकांना मरणे, ज्यांनी त्या मरणाच्या योग्य काहीच चुकीचे केले नाही" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [दोष](../kt/guilt.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [१ करिंथकरांस पत्र ४:३-४](rc://*/tn/help/1co/04/03)
* [१ शमुवेल १९:५](rc://*/tn/help/1sa/19/04)
* [प्रेषितांची कृत्ये २०:२६](rc://*/tn/help/act/20/25)
* [निर्गम २३:७](rc://*/tn/help/exo/23/06)
* [यिर्मया २२:१७](rc://*/tn/help/jer/22/17)
* [ईयोब ९:२३](rc://*/tn/help/job/09/21)
* [रोमकरास पत्र १६:१८](rc://*/tn/help/rom/16/17)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[८:६](rc://*/tn/help/obs/08/06)__ दोन वर्षांनंतर, __निष्पाप__ असूनही योसेफ तुरुंगातच होता.
* __[४०:४](rc://*/tn/help/obs/40/04)__ त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तुला देवाची भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य __निर्दोष__ आहे.
* __[४०:८](rc://*/tn/help/obs/40/08)__जेव्हा येशूवर पहारा करत असलेल्या सैनिकाने हे सर्व पाहीले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘खरोखर, हा मनुष्य __निष्पाप__ होता. ‌‌‌तो देवाचा पुत्र होता.
## शब्द माहिती
* स्ट्रोंग: एच2136, एच2600, एच2643, एच5352, एच5355, एच5356, जी121