mr_tw/bible/kt/innocent.md

4.6 KiB
Raw Permalink Blame History

निर्दोष

व्याख्या:

"निर्दोष" या संज्ञेचा अर्थ एखाद्या अपराधामध्ये किंवा इतर चुकीच्या गोष्टीमध्ये दोषी नसणे असा होतो. हे सर्वसामान्यपणे वाईट गोष्टींमध्ये सहभागी नसलेल्या लोकांसाठी देखील संदर्भित केले जाऊ शकते.

  • काहीतरी चुकीचे केले असा दोष एखाद्यावर लावला असेल, आणि जर त्या व्यक्तीने काहीच चुकीचे केले नसेल तर त्याला निर्दोष असे म्हणतात.
  • काहीवेळा "निर्दोष" ही संज्ञा अशा लोकांना संदर्भित करते, ज्या लोकांना वाईट वागणूक मिळावी असे त्यांनी काहीच केलेले नसते, तरीही ती त्यांना मिळत असते, जसे की, शत्रू सैन्याच्या हल्ल्यामधील "निर्दोष लोक."
  • बायबलमध्ये, "रक्त" "हत्या" यास दर्शवू शकते, म्हणून "निष्पाप रक्त" म्हणजे "अशा लोकांना ठार मारणे जे मरण्यास पात्र नव्हते."

भाषांतर सूचना:

  • बऱ्याच संदर्भामध्ये, "निर्दोष" या शब्दाचे भाषांतर "दोषी नसलेला" किंवा "जबाबदार नसलेला" किंवा कशासाठीही "दोष न लागलेला" असे केले जाऊ शकते.
  • साधारणपणे निर्दोष लोकांचा संदर्भ देताना, या संज्ञेचे भाषांतर "ज्याने काहीच चुकी केली नाही" किंवा "जो वाईटामध्ये सामील नव्हता" असे केले जाऊ शकते.
  • "निर्दोष रक्त पाडणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "अशा लोकांना मरणे, ज्यांनी त्या मरणाच्या योग्य काहीच चुकीचे केले नाही" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: दोष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • ८:६ दोन वर्षांनंतर, निष्पाप असूनही योसेफ तुरुंगातच होता.
  • ४०:४ त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तुला देवाची भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.
  • __४०:८__जेव्हा येशूवर पहारा करत असलेल्या सैनिकाने हे सर्व पाहीले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘खरोखर, हा मनुष्य निष्पाप होता. ‌‌‌तो देवाचा पुत्र होता.

शब्द माहिती

  • स्ट्रोंग: एच2136, एच2600, एच2643, एच5352, एच5355, एच5356, जी121