3.2 KiB
3.2 KiB
नम्र, लीन, नम्रता
व्याख्या:
“नम्र” ही संज्ञा अशा व्यक्तीचे वर्णन करते जी स्वत: ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत नाही. तो गर्विष्ठ किंवा घमंडी नाही. नम्रता ही नम्र असण्याचा गुण आहे.
- देवासमोर नम्र असणे म्हणजे त्याची महानता, शहाणपण आणि परिपूर्णतेच्या तुलनेत एखाद्याची दुर्बलता आणि अपूर्णता समजून घेणे.
- जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला नम्र करते तेव्हा स्वत: ला कमी महत्त्वतेच्या स्थितीत ठेवते.
- नम्रता म्हणजे स्वतःच्या गरजेपेक्षा इतरांच्या गरजा पूर्ण करणे.
- नम्रता म्हणजे एखाद्याच्या भेटवस्तू आणि क्षमता वापरताना विनम्र वृत्तीने सेवा करणे होय.
- “नम्र व्हा” या वाक्यांशाचे भाषांतर “गर्व करू नका” असे केले जाऊ शकते.
- “देवासमोर स्वत: ला नम्र करा” याचे भाषांतर “आपली इच्छा देवाला समर्पित करा, असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: गर्विष्ठ)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
- 17:2 दावीद देवावर भरवसा ठेवणारा आणि आज्ञा पाळणारा एक नम्र व नीतिमान मनुष्य होता.
- 34:10 " प्रत्येक गर्विष्ठाला देव नम्र करील, आणि जो कोणी स्वत: ला नम्र करतो तो त्याला उंच करील."
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H1792, H3665, H6031, H6035, H6038, H6041, H6800, H6819, H7511, H7807, H7812, H8213, H8214, H8215, H8217, H8467, G08580, G42360, G42390, G42400, G50110, G50120, G50130, G53910