mr_tw/bible/kt/hades.md

35 lines
4.4 KiB
Markdown

# अधोलोक, मृतलोक
## व्याख्या:
"हेड्स" (ग्रीक मध्ये) आणि "शीओल" (इब्रीमध्ये) या संज्ञा "खालील जगासाठी" योग्य नावे आहेत, म्हणजे एक भूमिगत निवासस्थान जिथे प्राचीन संस्कृतीतील लोकांचा असा विश्वास होता की मृत व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर जाईल.
* जुन्या करारात, इब्री संज्ञा "शीओल" एकतर विशेष नाव किंवा सामान्य नाम म्हणून वापरली जाऊ शकते ज्याचा अर्थ "भूमिगत" असा आहे.
* नवीन करारामध्ये, ग्रीक संज्ञा "हेड्स" याचे वर्णन येशूला नाकारलेल्या मृत लोकांसाठी एक स्थान म्हणून केले आहे. नवीन कराराचे वर्णन लोक मृतलोकाकडे "खाली जाणे" असे म्हणून करतात.
## भाषांतर सूचना:
* जुन्या करारातील "अधोलोक" ही संज्ञा संदर्भानुसार विविध प्रकारे भाषांतरील केली जाऊ शकते. काही शक्यतांचा समावेश आहे: "मृतांची जागा;" "मृत आत्म्यांसाठी जागा;" "खड्डा;" किंवा "मृत्यू."
* संदर्भानुसार नवीन कराराचा शब्द "हेड्स" याचे विविध प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते. काही शक्यतांमध्ये समाविष्ट आहे: "अविश्वासू मृत आत्म्यांसाठी जागा;" "मृतांना त्रास देण्याचे ठिकाण;" किंवा "अविश्वासू मृत लोकांच्या आत्म्यांसाठी जागा."
* काही भाषांतरे "अधोलोक" आणि "मृत्यूलोक" हे शब्द असेच ठेवून, भाषांतर करण्याच्या भाषेमध्ये ते व्यवस्थित बसतील ह्याप्रमाणे त्यांच्या शब्दाच्या वर्णामध्ये बदल करतात. (पाहाः [अज्ञात कसे भाषांतरित करावे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
* हे स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक शब्दाबरोबर एका वाक्यांशास जोडले जाऊ शकते, अे करण्याची उदाहरणे आहेत, "अधोलोक, मेलेल्या लोकांची जागा" आणि "मृत्यूलोक, मृतांची जागा."
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-unknown))
(हे देखील पाहा: [मृत्यू](../other/death.md), [स्वर्ग](../kt/heaven.md), [नरक](../kt/hell.md), [कबर](../other/tomb.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये २:३१](rc://*/tn/help/act/02/29)
* [उत्पत्ति ४४:२९](rc://*/tn/help/gen/44/27)
* [योना २:२](rc://*/tn/help/jon/02/01)
* [लुक १०:१५](rc://*/tn/help/luk/10/13)
* [लुक १६:२३](rc://*/tn/help/luk/16/22)
* [मत्तय ११:२३](rc://*/tn/help/mat/11/23)
* [मत्तय १६:१८](rc://*/tn/help/mat/16/17)
* [प्रकटीकरण १:१८](rc://*/tn/help/rev/01/17)
## शब्द माहीती
* स्ट्रोंग: एच7585, जी00860