mr_tw/bible/kt/goodnews.md

6.8 KiB
Raw Permalink Blame History

शुभवार्ता, सुवार्ता

व्याख्या:

"सुवार्ता" या शब्दाचा शब्दशः अर्थ "शुभवार्ता" असा होतो आणि संदेश किंवा घोषणेला संदर्भित करते जे लोकांना काहीतरी सांगते ज्यामुळे त्यांना फायदा होतो आणि त्यांना आनंद होतो.

  • बायबलमध्ये, हा शब्द सहसा वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाद्वारे लोकांसाठी असलेलेल्या देवाच्या तारणाच्या संदेशास सूचित करतो.
  • बऱ्याच इंग्रजी पवित्र शास्त्रांमध्ये, "शुभवार्ता" या शब्दाचे भाषांतर सहसा "सुवार्ता" असे केले आहे आणि ते वाक्यांशामध्ये वापरले गेले आहे जसे की, "येशू ख्रिस्ताची सुवार्ता," "देवाची सुवार्ता" आणि "राज्याची सुवार्ता."

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "शुभ संदेश" किंवा "चांगली घोषणा" किंवा "देवाचा तारणाचा संदेश" किंवा "येशुबद्दलच्या चांगल्या गोष्टी ज्या देव आपल्याला शिकवतो" यांचा समावेश होतो.
  • संदर्भाच्या आधारावर, "ची शुभवार्ता" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "च्या बद्दलची शुभवार्ता" किंवा "च्या बदद्दल शुभ वार्ता/संदेश" किंवा "च्यापासून चांगला संदेश" किंवा "देव सांगत असलेल्या चांगल्या गोष्टी" किंंवा "देव लोकांना कश्याप्रकारे वाचवितो तो जे सांगतो" या वाक्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: राज्य, बलिदान, तारण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:6 देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!
  • 26:3 येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस सुवार्ता सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यास सोडवुन पाठवावे. हे परमेश्वराच्या कृपेचे वर्ष आहे.”
  • 45:10 फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
  • 46:10 आणि मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पाठविले.
  • 47:1 एके दिवशी, पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूविषयची चांगली वार्ता सांगण्यासाठी गेले.
  • 47:13 येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली, व मंडळीची वाढ होत गेली.
  • 50:01 सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी ऐकत आहेत.
  • 50:2 येशू या पृथ्वीवर असताना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता संपुर्ण जगामध्ये गाजवतील, आणि तेव्हा शेवट होईल."
  • 50:3 स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच सुवार्ता ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी20970, जी20980, जी42830