3.1 KiB
3.1 KiB
सहभागीता
व्याख्या:
सामान्यपणे, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ लोकांच्या समूहातील सदस्यांमधील मैत्रीपूर्ण संवादाशी आहे, जे समान रुची आणि अनुभव सामायिक करतात.
- पवित्र शास्त्रामध्ये, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ ख्रिस्तामधील विश्वासनाऱ्यांच्या एकतेशी आहे.
- ख्रिस्ती सह्भागीता हा विश्वासणाऱ्यांचे ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याबरोबर असलेल्या संबंधाद्वारे एकमेकांशी असलेला सामायिक नातेसंबंध आहे.
- सुरुवातीचे ख्रिस्ती लोक त्यांची सह्भागीता देवाच्या वचनांना ऐकण्याद्वारे आणि एकत्रित प्रार्थना करण्याद्वारे, त्यांच्या मालकीच्या वस्तू सामायिक करण्याद्वारे आणि एकत्रित जेवण करण्याद्वारे व्यक्त करतात.
- ख्रिस्ती लोक सुद्धा येशूवरील विश्वासाच्याद्वारे आणि त्याच्या वधस्तंभावरील याज्ञासंबंधीच्या मरणाद्वारे, ज्याने देव आणि लोक ह्यांच्या मधील अडसर दूर केला, देवाबरोबर सह्भागीता करू शकतात.
भाषांतर सूचना:
- "सहभगीता" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "एकत्रित सामायिक करणे" किंवा "नातेसंबंध" किंवा "सख्य" किंवा "ख्रिस्ती समुदाय" असे केले जाऊ शकते.
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 योहान 1:3
- प्रेषितांची कृत्ये 2:40-42
- फिलीप्पेकरास पत्र 1:3-6
- फिलीप्पेकरास पत्र 2:1
- फिलीप्पेकरास पत्र 3:10
- स्तोत्र 55:12-14
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H2266, H8667, G2842, G2844, G3352, G4790